जेएनएन, मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएने जोरदार वाढत आघाडी घेतली आहे. बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. इंडिया आघाडीला 100 चा आकडाही गाठता न आल्याने त्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एनडीएने तब्बल 200 जागांवर आघाडी घेतली असून, बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे.
काँग्रेस पक्ष जास्त जागा मागतो
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, “जागावाटप करताना काँग्रेस पक्ष जास्त जागा मागतो; पण निकाल लागल्यावर त्या जागांवर विजय मिळवू शकत नाही.”
प्रत्यक्ष लढतीत ते जागा जिंकण्यात अपयशी
दानवे यांनी काँग्रेसच्या निवडणूक धोरणांवर सवाल उपस्थित करत म्हटले की, जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने आघाडीवर दडपण आणले, मात्र प्रत्यक्ष लढतीत ते जागा जिंकण्यात अपयशी ठरले. बिहारमधील निकाल महाआघाडीच्या कमजोर पायाभरणीचे द्योतक असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
बिहारच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले असताना, महाआघाडीतील अंतर्गत नाराजी आणि रणनीतीतील उणिवा पुन्हा एकदा समोर आले आहे.
