एजन्सी, लातूर, Latur News: लातूरमध्ये एका 18 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
यात मुख्य आरोपी आणि त्या आरोपीला जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकणी दोन कॅफे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
दोन कॅफेच्या मालकांना अटक
तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी रिहान गुलाब शेखला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या दोन कॅफेचे इतर दोघे मालक आहेत.
POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), POCSO कायदा आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
